Breaking News

रविवारी मध्यरात्री ‘सुपरमून’चे दर्शन I Agrahayana‬, ‪Purnima‬‬ I रविवारी पाहता येणार सुपरमून I वर्षातील पहिला, शेवटचा ‘सुपरमून’ उद्या; चंद्र रोजपेक्षा 14 पट मोठा दिसणार

रविवारी पाहता येणार सुपरमून

जाणून घ्या अवकाशात नेमके काय बदल होतात

रविवारी मध्यरात्री ‘सुपरमून’चे दर्शन I Agrahayana‬, ‪Purnima‬‬ I रविवारी पाहता येणार सुपरमून I 





पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर त्याला ‘सुपरमून’ म्हटले जाते. येत्या रविवारी, ३ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात ‘सुपरमून’ दिसणार आहे. चंद्राची कक्षा लंबवर्तुळाकार असते, दर महिन्यात चंद्र काही काळ पृथ्वीच्या जवळ असतो तर काही काळ दूर जातो. मात्र अशाप्रकारे चंद्र पृथ्वीच्या जवळ येण्याच्या काळात पौर्णिमा आल्यास चंद्राचा आकार मोठा दिसतो त्याला सुपरमून म्हटले जाते. यंदा ४ डिसेंबरला पहाटे (३ डिसेंबरच्या रात्री) २.१५ वाजता चंद्र मोठा दिसणार आहे. हा चंद्र आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकणार आहोत असे नेहरु तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी सांगितले.
ही घटना वर्षातून एकदा किंवा दोनदा होते. मात्र त्याचा नेमका कालावधी फार आध सांगता येत नाही. यावेळी चंद्र १४ टक्क्यांनी मोठा दिसतो. तसेच त्याचा प्रकाशही ३० टक्क्यांनी वाढलेला असतो असेही परांजपे यांनी सांगितले. यानंतरचा सुपरमून लगेचच म्हणजे १ जानेवारीच्या सकाळी दिसणार आहे. त्यावेळी चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ५६ हजार किलोमीटर अंतरावर येणार असल्याचेही सोमण यांनी सांगितले. तांत्रिकदृष्ट्या विचार केला तर चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर अंतरावर असतो. परंतु रविवारी चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ५७ हजार किलोमीटर अंतरावर येणार आहे.
पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीजवळ आलेल्या चंद्राला रिचर्ड नोले यांनी सर्वप्रथम १९७९ मध्ये ‘सुपरमून’ असे नाव दिले. रविवारी, ३ डिसेंबर रोजी दत्तजयंती आहे. या दिवशी सायंकाळी ५ वाजून ५६ मिनिटांनी पूर्वेला पौर्णिमेचा चंद्र रोहिणी नक्षत्रात असताना उगवेल. यावेळी चंद्रबिंब नेहमीपेक्षा जास्त मोठे आणि तेजस्वी दिसेल. संपूर्ण रात्रभर आकाशात दर्शन देऊन चंद्र सोमवारी सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी मावळेल. रविवारी रात्री ९ नंतर सर्वांना हे दर्शन घेता येणार आहे. याआधी १४ नोव्हेंबर २०१६ रोजी सुपरमूनचे दर्शन झाले होते.
येत्या तीन डिसेंबरला मार्गशीर्ष पौर्णिमेला सर्वात मोठा चंद्र म्हणजेच सुपरमून पाहण्याची संधी मिळणार आहे. रविवारी रात्री चंद्र रोजच्यापेक्षा १४ पट मोठा आणि १६ पट तेजस्वी दिसेल. २०१७ मधील हा पहिला आणि शेवटचा सुपरमून असेल. यानंतर २ जानेवारी २०१८, १९ फेब्रुवारी २०१९ व ८ एप्रिल २०२० रोजी सुपरमूनचे दर्शन होईल.

मार्गशीर्ष पौर्णिमेला चंद्र आणि पृथ्वीतील अंतर ३ लाख ५७ हजार ४९२ किलोमीटर राहील, अशी माहिती रामन सायन्स सेंटरचे तंत्र सहायक महेंद्र वाघ यांनी दिली. पौर्णिमेचा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ येतो तेव्हा तो आकाराने खूप मोठा दिसतो. या चंद्राला सुपरमून म्हटले जाते. पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत प्रदक्षिणा घालताना चंद्र पौर्णिमेला पृथ्वीच्या जवळ येतो. त्याला आॅर्बिट इलेप्टिकल असे म्हणतात, असे वाघ म्हणाले.

पृथ्वीच्या कक्षेत फिरताना चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो त्या स्थितीस ‘पेरिजी’ आणि जेव्हा दूर जातो त्या स्थितीस ‘अपोजी’ म्हणतात. एरवी चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लाख ८४ हजार किमी अंतरावर असतो. पण या वेळेस पौर्णिमेला चंद्र ३ लाख ५७ हजार किमी अंतरावर येईल. मार्गशीर्ष पौर्णिमा रात्री ९ वाजून १७ मिनिटांनी पूर्ण होईल.

मागील वर्षी तीन सुपरमून
२०१६ मध्ये पहिला सुपरमून १६ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहायला मिळाला होता. त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या ३,५७,८५७ किलोमीटरइतका जवळ गेला होता. त्यानंतर १४ नोव्हेंबर २०१६ ला दुसरा आणि १४ डिसेंबर २०१६ ला सुपरमून दिसला होता.

Tags :- Agrahayana‬, ‪Purnima‬‬, वर्षातील पहिला, शेवटचा ‘सुपरमून’ उद्या; चंद्र रोजपेक्षा 14 पट मोठा दिसणार



No comments